Homeक्राईमबेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटकहवेली पोलिसांनी सपाळा रचून दोघांना केले जेरबंद..

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक
हवेली पोलिसांनी सपाळा रचून दोघांना केले जेरबंद..

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना दोघांना सपाळा रचून दोघांना जेरबंद केले आहे. मोठा, गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदरच हवेली पोलिसांनी कारवाई केली आहे.
हवेलीचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले की, खडकवासला धरण चौक परीसरात पेट्रालिंग करत‌ होतो. सोबत पोलिस हवालदार विलास प्रधान, संतोष तोडकर, दीपक गायकवाड, गणेश धनवे, संतोष भापकर, पोलिस नाईक राजेंद्र मुंढे पोलिस शिपाई सचिन गुंड होते.
यावेळी, खडकवासला गावाच्या स्मशानभुमी जवळ देवलेश उर्फ देवा साळुंखे व अतिश जोरी हे दोघे थांबले आहेत. त्यांच्याजवळ एक गावठी पिस्टल व राऊंड आहे. ते कोणाला तरी गावठी पिस्टल विकण्याच्या किंवा कुठला तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार,  पोलिस अधिकारी, अंमलदार व पंच यांना मिळालेल्या माहिती त्यांना समजावून‌ सांगितली.
त्यानुसार, आम्ही त्या ठिकाणी पोचलो. वेगवेगळे दिशेला दबा धरून बसलो. थोडा वेळानंतर तेथे देवलेश उर्फ देवा साळुंखे व त्याचे सोबत एक अनोळखी इसम असे पायी चालत येत होते. असे दिसले. त्यांना खडकवासला स्मशानभुमीचे जवळ आल्यावर आम्ही शनिवारी दुपारी साडेतीन वाजता त्यास जागीच पकडले.‌
त्यांना त्यांची नावे विचारली असता देवलेश उर्फ देवा सुर्यकांत साळुंखे (वय ३८, रा.संत रोहिदासनगर खडकवासला, ता.हवेली) अतिश मधुकर जोरी (वय २४, रा. आझाद तरुण मंडळ, खडकवासला ता.हवेली) असे सांगितले.
त्यानंतर, त्यांची पंचासमक्ष अंग झडती घेतली. देवलेश उर्फ देवा सुर्यकांत साळुंखे याचे कमरेस पाठीमागे पॅन्टचे आत खोचुन ठेवलेला एक गावठी पिस्टल सापडला. तसेच, अतिष मधुकर जोरी यांचे पॅटचे खिशात पिस्टलचे एकुण सात जिवंत काडतूस सापडले.  त्यांच्याकडे शस्त्र संबंधी कोणताही परवाना नव्हता. विनापरवाना बेकायदेशीररित्या एक गावठी पिस्टल व सात जिवंत काडतूस बेकायदेशीरपणे विना परवाना जवळ बाळगला होता.‌
याबाबत, हवेली पोलिस शस्त्र अधिनियम व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, तसेच, पोलिस उपअधिक्षक दिलीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. अधिक तपास महिला फौजदार शितल टेंबे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!