Homeक्राईममंगळवार पेठेत काची वस्तीतील घर जळालेघराबाहेर बसलेली ज्येष्ठ महिला बचावली

मंगळवार पेठेत काची वस्तीतील घर जळाले
घराबाहेर बसलेली ज्येष्ठ महिला बचावली

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

मंगळवार पेठेतील काची वस्तीत असलेल्या एका घराला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

मंगळवार पेठेतील एसएसपीएम प्रशालेच्या पाठीमागील बाजूस काची वस्ती आहे. या वसाहतीत बैठी पत्र्यांची घरे आहे. सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास घरातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. घरात चव्हाण कुटुंबीय राहायला आहेत. घरात कोणी नव्हते. चव्हाण यांची आजी घराबाहेर बसल्या होत्या. वस्तीतील रहिवाशांनी काही अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब दोन मिनिटात तेथे पोहोचला.

अग्निशमन दलाचे तांडेल रऊफ शेख, गणेश पराते, वैष्णव गाडे, दीपक क्षीरसागर, हिरामण मोरे यांनी पाण्याचा मारा करुन आग आटेक्यात आणली. जवानांनी पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. घरात कोणी नसल्याने दुर्घटना टळली. आगीत गृहोपयोगी साहित्य आणि छताचे पत्रे जळाले. जवानांनी घरातून एक छोटा सिलिंडर बाहेर काढला. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील तांडेल रऊफ शेख यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!