Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा-राज्य...

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा-राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत

६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे, (पूणे 24 तास ब्युरो )

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात महसूली उत्पन्न, गुन्हे अन्वेषण तसेच अनुज्ञप्त्यांवर कारवाईच्या बाबतीत गतवर्षीपेक्षा भरीव कामगिरी केली आहे. या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षात २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे. सन २०२३- २४ च्या २ हजार ७२९ कोटी ४४ लाख रुपयांच्या तुलनेत महसुलात ९.८५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ५ हजार ९९५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५ हजार ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे २९९ बंधपत्र घेण्यात आले असून रक्कम २ कोटी १८ लाख रुपये रकमेची बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. एमपीडीए कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या एकूण ९ प्रस्तावांपैकी १ प्रकरणात सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनुज्ञप्तीचे वारंवार सखोल तपासणी करुन नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई येत आहे. सन २०२४-२५ वर्षात एकूण ५६९ अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ४ अनुज्ञप्ती कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. या विभागीय विसंगती प्रकरणात १ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड lm वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार धाब्यावर अवैध मद्य विक्री करणाऱ्याविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध एकूण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये १ हजार २५० आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण ८ लाख १९ हजार रुपये द्रव्य दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई न करता त्यासोबत या ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांनादेखील चाप बसणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच परराज्यातील मद्य, अवैध ढाबे, अवैध ताडी, विक्री विरुद्ध २१ पथकांमार्फत कठोर करण्यात येत आहे. नागरिकांना मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!