Monday, August 24, 2026
spot_img
Homeक्रीडाशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ स्थळाची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ स्थळाची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

पुणे,(पूणे 24 तास ब्युरो )

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात शुक्रवारी वितरण होणार असून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समारंभ स्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. हा पुरस्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक क्रीडा प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे चोख नियोजन करा अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या

यावेळी श्री. भरणे यांनी व्यासपीठ व्यवस्था, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार, पुरस्कारीर्थींची निवास व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींविषयी माहिती घेतली.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जीवन गौरवसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!