Homeताज्या बातम्यामुंढव्यातील जमिनीचा व्यवहार अजुनही जैसे थे, रद्द करारनामा न झाल्याने तर्कवितर्

मुंढव्यातील जमिनीचा व्यवहार अजुनही जैसे थे, रद्द करारनामा न झाल्याने तर्कवितर्

पुणे 24 तास: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेले बेकायदा खरेदीखत सोमवारीही (दि. १०) रद्द करण्यात आले नाही. हा व्यवहार रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार होते. मात्र, याबाबत काहीही हालचाल न झाल्याने व्यवहार रद्द केव्हा होईल याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान या खरेदी व्यवहाराबाबत नेमण्यात आलेल्या मुठे समितीने कामकाजास सुरुवात केली आहे. त्यात समितीचे अध्यक्ष सहनोंदणी महानिरीक्षक यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

मुंढवा येथील सुमारे ४० एकर जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा कारनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी या कंपनीने केला. सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन प्रत्यक्षात ३०० कोटींमध्ये झालेला व्यवहार, त्यावर पाच टक्के मुद्रांक शुल्काची माफी व बुडविलेले दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन असूनही झालेला व्यवहार, या सर्व कारणांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेची प्रचंड झोड उठली.

या व्यवहारात ३०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली असली तरी प्रत्यक्षात खरेदीदाराने अर्थात अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना एकही रुपया दिला नसल्याचे खरेदी खतावरून स्पष्ट झाले होते. पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केल्यानंतर नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने संबंधित कंपनीला, पहिल्यांदा झालेला खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सात टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हा व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे. यासाठीही संपूर्ण ७ टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळे ४२ कोटी रुपये अधिक त्यावरील दंड सुमारे ३ लाख ६० हजार रुपये भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार आहे.

व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवसांची सुटी होती. त्यामुळे हा रद्द करारनामा होऊ शकला नाही. सोमवारी कंपनीकडून ४२ कोटी रुपये भरून हा व्यवहार रद्द केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली होती. मात्र, सोमवारी दिवसभरात व्यवहार रद्द करण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये असताना ही ४२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्काची रक्कम नेमक्या कोणाच्या खात्यावरून सरकार जमा केली जाईल, हेही स्पष्ट होऊ शकले नाही. आता हा व्यवहार नेमका केव्हा रद्द होईल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मुठे यांनी या तपासात आता महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या प्रकरणातील

या प्रकरणात दुय्यम निबंधकांनी व्यवहारात केलेल्या चुका तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळालेले इरादा पत्र याची तपासणी केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!