पुणे 24 तास:- शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मातंग समाजातील महिला ॲड. कोमल साळुंखे यांची महिला प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कोमल साळुंके यांना नियुक्ती पत्र देत सन्मानित करण्यात आले.
कोमल साळुंखे या उच्चशिक्षित असून बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष, शाहू शिक्षण संस्थेवर विश्वस्त, सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच विविध पदांवर सध्या कार्यरत आहे.
माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या त्या कन्या आहेत.
यावेळी त्यांना पुढील वाटचालीस समाज बांधवांनी शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























