Homeताज्या बातम्यासंगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. - प्रा.डॉ मिलिंद भोई

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for singers या देशभरातील गायकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. मिलिंद भोई यांचे व्याख्यान

धारवाड:-  संगीताची निर्मिती ही दैवी परंपरेतून झाली आहे. भारतीय संगीत हे कृष्णाच्या बासरीतून ,शंकराचे डमरूतून , सरस्वतीच्या विणेतून निर्माण झाले आहे. परमेश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी स्वर आणि सूर हे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे अध्यात्म व संगीत या एकच नाण्याचे दोन बाजू आहेत. त्याला शास्त्रीय संशोधनाची आणि विज्ञानाची दृष्टी देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्वरतज्ञ प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for singers या देशभरातील गायकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. मिलिंद भोई यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी कर्नाटक विद्यापीठाचे श्री इ.आर.अंगडी, संस्कार भारती चे समन्वयक डॉ. सौभाग्य कुलकर्णी , गणपती संगीत विद्यालय- धारवाड चे संचालक संगीततज्ञ डॉ. श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

या व्याख्यानाला गायक ,निवेदक, शास्त्रीय गायक, कीर्तनकार ,प्राध्यापक, शिक्षक, व्याख्याते, पत्रकार, सूत्रसंचालक अश्या आवाज हीच ओळख असणाऱ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वरसाधनेमध्ये आवश्यक दिनक्रम, आहार विहार ,व्यायाम प्राणायाम, व्यसनाचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून संवाद साधला.
या व्याख्यानात दृक- श्राव्य माध्यमातून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, सुरेश वाडकर, संगीतकार आनंदजी (कल्याणजी आनंदजी), संगीतकार प्यारेलाल ( लक्ष्मीकांत- प्यारेलाल ),तालयोगी शिवमणी, जगप्रसिद्ध निवेदक आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट श्री हरीश भिमानी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या निमित्ताने गायत्री व्हॉईस केअर रिसर्च सेंटर, पुणे यांच्या वतीने स्वर साधनेमध्ये उपयुक्त असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते. कर्नाटक विद्यापीठांमध्ये या विषयीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस या विद्यापीठाचे प्राध्यापक श्री आंगडी यांनी याप्रसंगी बोलून दाखवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!