Homeताज्या बातम्यामहावितरणचे प्रतीक वाईकर खो-खोच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार...

महावितरणचे प्रतीक वाईकर खो-खोच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार…

पुणे (पुणे 24 तास ब्युरो): महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते होण्याचा मान पटकावला आहे. तब्बल २० देशांचा सहभाग असलेल्या या विश्वस्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार व उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रतीक वाईकर यांनी मोलाची कामगिरी केली. विजेत्या संघासह श्री. वाईकर यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महावितरणचे खेळाडू म्हणून विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतीक वाईकर यांचे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन / मानव संसाधन) अरविंद भादिकर, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

क्रीडा कोट्यातून १९ जून २०१२ मध्ये प्रतीक वाईकरवयाच्या १९ व्या वर्षी महावितरणमध्ये रुजू झाले. दि. २७ मार्च १९९२ रोजी जन्मलेले प्रतीक यांनी सन २००० च्या सुमारास बास्कटेबॉल, लंगडी व गोल खो-खो खेळायला सुरवात केली. प्रामुख्याने खो-खो खेळातील चपळाई व प्रगती पाहून पुण्याच्या नामांकित नवमहाराष्ट्र क्लबमध्ये प्रतीक यांना प्रवेश मिळाला. तेव्हापासून ते उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून घडत गेले. संगणकशास्त्रात बीएस्सी पदवीधर असलेल्या प्रतीक यांनी फायनान्समध्ये एमबीए केलेले आहे. त्यामुळे खेळ व अभ्यास या दोहोंना कायम महत्व दिल्याने कुटुंबियांचे देखील प्रतीक यांना खो-खो खेळण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले.

महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त असलेले प्रतीक वाईकर यांनी महाराष्ट्र संघाच्या १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील व १८ वर्षाखालील वयोगटाचे व वरिष्ठ गटाचे नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव खो-खोपटू आहे. खो-खोमध्ये मातीकडून मॅटकडे प्रवास सुरु केल्यानंतर दुखापत होण्याचा धोका वाढला तरी कौशल्य, चपळाई व शारीरिक फिटनेसकडे अधिक लक्ष देत प्रतीक यांनी व्यावसायिक खो-खो स्पर्धेत भाग घेणे सुरू केले. यात खो-खो प्रोफेशनल लिगमध्ये तेलगू योद्धांचे नेतृत्व करीत उपविजेतेपद पटकावले.

खो-खो खेळात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ख्याती असलेले प्रतीक हे संघ नेतृत्वामध्ये सांघिक कामगिरीला नेहमीच प्राधान्य देतात, हे विशेष. त्यांच्यासोबत महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये खो-खोचे उत्कृष्ट खेळाडू घडत आहेत. प्रतीक यांना खो-खोच्या विविध स्पर्धा व सरावासाठी महावितरणकडून कायमच सहकार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रतीक यांचे घर, क्रीडांगण व कार्यालय केवळ दोन किलोमीटर परिघात ठेवण्यात आले आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘प्रतीक वाईकर यांना महावितरणमध्ये एक खेळाडू म्हणूनच पाहिले गेले. खेळाडू म्हणून त्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत नोकरी करताना खेळाडू म्हणून कोणतीही अडचण येणार नाही याची वेळोवेळी काळजी घेण्यात आली. त्याची फलश्रृती म्हणून प्रतीकने महावितरणच नव्हेतर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे’.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!