Homeताज्या बातम्यापर्यावरणीय न्याय' विषयावरील आंतरराष्ट्रीय  परिषदेला चांगला प्रतिसाद..

पर्यावरणीय न्याय’ विषयावरील आंतरराष्ट्रीय  परिषदेला चांगला प्रतिसाद..

पर्यावरणीय न्याय परिषदेत डावीकडून प्रा.ज्योतीराम मोरे,डॉ.प्रवीण सप्तर्षी,डॉ.ए.जी.अमरसिंघे,डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ.नदाफ आणि प्रा.संतोष माने 

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

‘पर्यावरणाला न्याय म्हणजे मानवतेला न्याय’ :परिषदेतील सूर

इंडियन इन्स्टिट्यूट  फॉर सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च संचलित  राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय(खेड, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणीय न्याय: दक्षिण आशियातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक समस्या’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ,आंतरविद्याशाखीय  परिषदेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ही परिषद महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, ग्लोबल फाऊंडेशन आणि पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी २०२५  रोजी गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली.

परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र गांधीस्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, अल-कुद्स युनिव्हर्सिटी, पॅलेस्टाईन येथील प्रा.डॉ.मुनथेर मोहद इब्राहिम,महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद व पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण सप्तर्षी,श्रीलंकेतील केलोनिया युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.ए.जी.अमरसिंघे,गोव्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा.डॉ.एफ.एम.नदाफ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन,प्रा.संतोष माने,प्रा.डॉ.सुनील पाचर्णे,प्रा.ज्योतीराम मोरे,उपप्राचार्य धर्मेंद्र साळवे उपस्थित होते.

पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंके, आयआयटी (मुंबई)चे डॉ. हेमंत बेलसरे,डॉ.संभाजी शिंदे,डॉ.सागर माळी,डॉ.विनायक धुळप,डॉ.अशोक दिवेकर आदीनी विविध सत्रात मार्गदर्शन केले.’पर्यावरण हे एका देशाची मालकी किंवा जबाबदारी नसते,तर सर्व देशांची जबाबदारी असते.पर्यावरणाला न्याय देणे म्हणजे मानवतेला न्याय देणे होय,’असा सूर या परिषदेत उमटला.जेसिका मयूर,अबोली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

ही परिषद सकाळी १० वाजता सुरू झाली. परिषदेत नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि भारतातील तरुण संशोधकांचे सुमारे १५०  संशोधन निबंध तीन समांतर सत्रांमध्ये सादर केले गेले. ही परिषद सर्वसामान्य जनतेसाठी खुली होती.परिषदेचा उद्देश शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेला एकत्र आणून पर्यावरणीय न्यायाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा व विचारमंथन करणे हा होता.जागतिक राजकीय व्यवस्था, राष्ट्रीय आर्थिक रचना आणि संपत्तीचे केंद्रीकरण यामुळे निर्माण होणाऱ्या विषमतेचे परिणाम समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे आणि पर्यावरणीय न्यायाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण साधणे हे या परिषदेचे मुख्य ध्येय होते.

डॉ.अमरसिंघे म्हणाले,’ गांधीजींच्या विचाराने पर्यावरणीय न्याय गाठणे शक्य होणार आहे.पर्यावरण हे एका देशाची मालकी किंवा जबाबदारी नसते,तर सर्व देशांची जबाबदारी असते. नैसर्गिक साधनसंपत्तीची काळजी घेतली पाहिजे’. प्रा. डॉ.एफ.एम.नदाफ म्हणाले,’शाश्वत विकासाचा मार्ग पकडला पाहिजे.श्रीमंत देश, त्यांचे उदयोग विकसनशील देशांवर पर्यावरण नाशाचे दुष्परिणाम लादत आहेत, गरीब देशांना पर्यावरणीय न्याय मिळाला पाहिजे’.डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’पर्यावरणाला न्याय देणे म्हणजे मानवतेला न्याय देणे होय. विकासाबाबत गांधीजींचे विचार अंमलात आणले पाहिजेत.भावी पिढ्यांना पर्यावरण शिल्लक ठेवले पाहिजे’.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!