Homeक्राईमवानवडीत डंपरखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू

वानवडीत डंपरखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू

पुणे: (पुणे 24 तास ब्युरो)

महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपीबस चालकाला मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी वानवडीतील संविधान चौकात घडली. पीएमपी बस आणि कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर पीएमपी चालक बसमधून उतरुन त्याने डंपरचे छायाचित्र काढले. छायाचित्र काढून पाठीमागे जात असतानाच डंपरचालकाने वाहन सुरू केल्याने अपघात झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय मच्छिंद्र देशमुख असे अपघातात मृत्यू झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक रजत किशोर बाभुळकर (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, पीएमपी बस कात्रजहून हडपसरकडे निघाली होती. वानवडीतील संविधान चौकातून कचरा वाहतूक करणारा डंपर निघाला होता. डंपर बसला घासून गेल्याने आरसा तुटला. अपघातानंतर डंपरचालक न थांबता पुढे गेला. आरसा तुटल्याने पीएमपी चालक देशमुख यांनी तेथून निघालेल्या दुचाकीस्वारला थांबविले. दुचाकीस्वारासह देशमुख यांनी डंपरचालकाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांनी डंपर थांबविला. त्यानंतर देशमुख यांनी त्यांच्या मोबाइलमधील कॅमेऱ्यांतून डंपरचे छायाचित्र काढले. छायाचित्र काढून पाठीमागे जात असतानाच डंपरचालक बाभुळकर याने डंपर सुरू करून पुढे घेण्याचा प्रयत्न केला. देशमुख हे डंंपरच्या मागच्या चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपरचालक याला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!