Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापीएमआरडीएच्या सदनिकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पीएमआरडीएच्या सदनिकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.१२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३२५६ अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित १५ लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत २२ जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
सदनिकांची सोडत बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास वनविभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ परिषद सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे होणार आहे. अर्जदारांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!