Homeअमरावतीअमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

अमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणार स्पर्धा : ११६० खेळाडूंचा सहभाग

पुणे 24 तास:- मुंबई,

महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील ११६० खेळाडू आठ संघाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.

वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद अमरावती परिमंडलाकडे आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १२) सकाळी ९.१५ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/प्रकल्प)  सचिन तालेवार राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक  दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग) व  आदित्य जीवने (छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग), संचालक अनुदीप दिघे (वित्त),  योगेश गडकरी (वाणिज्य) व  राजेंद्र पवार (मानव संसाधन) तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व नागपूर प्रादेशिक संचालक  परेश भागवत, स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेते व उपविजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वसाधारण विजेत्या संघाला अजिंक्यपदाचा करंडक प्रदान करण्यात येईल. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. १५) दुपारी ५ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात होणार आहे.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष  अशोक साळुंके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव  मधुसूदन मराठे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!