पुणे 24 तास:- कलवड धानोरी येथील सामाजिक कार्यकर्ता फिरोज तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय मध्ये देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार एडवोकेट जयदेवराव गायकवाड,उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार श्री शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी उपेक्षा युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी व्यक्त केली. फिरोज तांबोळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























