Homeताज्या बातम्यामुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका;
न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली

पुणे : मोहिनी मोहिते, संपादक

मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण झाली. या प्रक्रियेत 170 दुय्यम निबंधक श्रेणी-1 अधिकार्‍यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-2 पदावर, तर 170 वरिष्ठ लिपिकांना दुय्यम निबंधक श्रेणी-1 पदावर पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नती प्रक्रियेत तृतीय श्रेणीतील सुमारे 22 कर्मचार्‍यांना वगळण्यात आल्याने विभागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचारी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सन 2022 मध्ये नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम 44 तसेच 12 जुलै 2021 च्या शासन परिपत्रकानुसार त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, निलंबनानंतर एका वर्षाच्या आत चौकशी पूर्ण करून शिक्षेची अंमलबजावणी करण्याची स्पष्ट तरतूद असतानाही, 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या विलंबाचा थेट फटका संबंधित कर्मचार्‍यांना बसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान पदोन्नती न मिळालेल्या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, विभागीय चौकशी वेळेत पूर्ण झाली असती, तर शिक्षेचा कालावधीही पूर्ण झाला असता आणि यावर्षी झालेल्या पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते. मात्र, शासनाच्या दिरंगाईमुळे त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले.

राजपत्रित अधिकार्‍यांसाठी नियम वेगळे आणि तृतीय श्रेणी कर्मचार्‍यांसाठी वेगळे निकष असे का? पदोन्नती प्रक्रियेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. विभागीय चौकशी सुरू असतानाही वर्ग-2 राजपत्रित अधिकार्‍यांना वर्ग-1 पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र, याच परिस्थितीत असलेल्या तृतीय श्रेणीतील कर्मचार्‍यांना पदोन्नतीपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे शासनाने राजपत्रित अधिकारी आणि तृतीय श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळे निकष लागू केले आहेत का, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.शासन निर्णयाचीही अंमलबजावणी नाही. कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार केवळ फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतील कर्मचार्‍यांना पदोन्नतीतून वगळण्याचा निर्णय झाला होता. उर्वरित सर्व पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचे निर्देश असूनही मुद्रांक व नोंदणी विभागाने त्यांची पुन्हा एकदा पदोन्नती रोखल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 बारा वर्षांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा

संबंधित 22 कर्मचारी 2014 मध्ये वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नत झाले होते. त्यानंतर 2022 मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी-1 आणि 2026 मध्ये सह दुय्यम निबंधक वर्ग-2 पदावर पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते वरिष्ठ लिपिक पदावरच कार्यरत असून, सलग बारा वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शासनाच्या विलंबामुळे आणि पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या कथित दुजाभावामुळे अन्याय झाल्याचा दावा करत संबंधित कर्मचारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत असल्याने मुद्रांक व नोंदणी विभागातील हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होणार ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...

0
१६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर येथे संपन्न होणार विशेष वैचारिक साहित्य संमेलन   मोहिनी मोहिते (संपादक) पुणे: पद्मपाणी फाउंडेशन आणि...

सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा, एकामागे एक राजीनामे मागण्यासाठी नको’

0
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे कॉक्रोच जनता पक्षाला आवाहन मोहिनी मोहिते (संपादक) पुणे प्रतिनिधी : लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आंदोलने करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

error: Content is protected !!