Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईम४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप

पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या घराची भिंत घरमालकाने बेकायदेशीररित्या पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲड. किरण गुळवे यांच्या मार्फत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, श्री. नेमिचंद शंभुनाथ राठोड हे गेली चार दशके संबंधित ठिकाणी कायदेशीर भाडेकरू म्हणून राहत आहेत. राठोड कुटुंब घराबाहेर असताना घरमालक सुनील वसंत कानाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी ४ ते ५ अज्ञात मजुरांच्या मदतीने घराच्या पाठीमागील भिंत पाडून घरात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही मौल्यवान वस्तूही चोरीला गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर राठोड कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात ॲड. किरण गुळवे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणत्याही भाडेकरूला जबरदस्तीने घराबाहेर काढता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी कायदा हातात घेतल्याचा हा गंभीर प्रकार असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत लागू असलेल्या गंभीर कलमांनुसार तातडीने प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नसून, तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे समजते. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!