Saturday, August 22, 2026
spot_img
HomeSRAएसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा

पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने मातंग समाजातील संतोष नेटके यांच्या घरावर प्रस्तावित कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाच्या बाजूने लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी संतोष नेटके यांच्या घरावर बेकायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने लोकप्रतिनिधी व समाजातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार सुनील कांबळे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे अध्यक्ष अनिल हातागळे, क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, पुणे शहर अध्यक्ष रवि क्षीरसागर यांनी सारसबाग येथील डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात बैठक घेऊन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

या पाठपुराव्यानंतर संबंधित प्रशासनाने प्रस्तावित कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचे सांगण्यात आले.

यानंतर ४ ऑगस्ट २०२६ रोजी मनोज आप्पा क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांनी काळाखडक येथे जाऊन संतोष नेटके व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी उपलब्ध कागदपत्रांची पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा केली.

यावेळी क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर यांनी सांगितले की, संतोष नेटके व त्यांच्या कुटुंबाच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करून सक्षम प्राधिकरणांसमोर ठोस पाठपुरावा करण्यात येईल. मातंग समाजातील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कायद्याबाहेर जाऊन कारवाई होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

संविधान, कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतिवीर सेना शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!