Friday, August 21, 2026
spot_img
HomeAhilyanagarराम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा सहकारी...

राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा सहकारी मनोज चौधरींचा आरोप; SIT चौकशी आणि राजीनाम्याची मागणी

पायल पोटभरे, प्रतिनिधी

पुणे 24 तास :- शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते अहिल्यानगर कडून बीड च्या दिशेला जात असताना काही अंतरावर मांदगाव परिसरात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला. खाडे हे शरद पवार पक्षातील पदाधिकारी असून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात.

घटना 26 नोव्हेंबरच्या रात्री घडली असून मिळालेल्या माहितीनुसार, राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसह अहिल्यानगरकडे जात असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला अडवले. या टोळक्याने लाठी-काठी, सत्तूर यांसारख्या अनेक शस्त्रांचा वापर करून गाडीची तोडफोड केली आणि खाडे यांच्यावर वार करून त्यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.

गंभीर अवस्थेत असलेल्या खाडे यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे.

राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी थेट आरोप केला आहे की, या संपूर्ण हल्ल्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा सहभाग असू शकतो. धस यांच्या भ्रष्टाचाराविषयी त्यांनी केलेल्या खुलाशांमुळे हा हल्ला घडवून आणला गेला असावा असे

चौधरी यांनी सांगितले. या प्रकरणात SIT चौकशीची मागणी करताना चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्ष तपासासाठी सर्वप्रथम सुरेश धस यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडली.

चौधरींनी पुढे आरोप केला की, “धस घरात बसून संपूर्ण कट रचत आहेत. राजकीय डावपेच रचून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात ज्यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवला, त्यांच्यावर अशा स्वरूपाचे हल्ले करवले जातात.”

या प्रकरणाचा तपास पोलीस विभागाकडून सुरु असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!