Homeक्रीडामौलाना आझाद सोशल असोसिएशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

मौलाना आझाद सोशल असोसिएशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

मौलाना आझाद जयंती : शौर्याला सलाम, शिक्षणाला प्रणाम – मौलाना आझादांचे विचार आणि कारगिल वीरांचा पराक्रमाचा गौरव…

पुणे 24 तास:- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी नेते हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक, आधुनिक शिक्षणव्यवस्थेचे शिल्पकार आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील मौलाना आझाद सोशल असोसिएशन तर्फे  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे अडीचशे गरजूंनी लाभ घेतला.

तसेच भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या भारतीय सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी कारगिल युद्धवीर विनोद मारुती माने, सदाशिव बळीराम घाडगे यांनी आयोजकांचे कौतुक केले. या ऐतिहासिक पराक्रमाची आठवण जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मौलाना आझाद सोशल असोसिएशनने कारगिल माजी सैनिकांचा विशेष सन्मान करून राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “मौलाना आझाद आदर्श पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार समाजातील सकारात्मक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरतो.

या उपक्रमाची सलग 13 वर्षे अविरत परंपरा सुरू आहे. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अमानत शेख, सचिव आदम सय्यद, उपाध्यक्ष मुबारक जमादार आणि डॉ. नासिर शेख यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सतीश राठोड, इम्रान शेख, अमीर शेख, सलमान शेख, अली शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस नेते अभय छाजेड, हज कमिटीचे माजी अध्यक्ष इब्राहिम भाईजान, माजी सैनिक सेल चे दीपक राजे शिर्के, श्रीमंत राठोड, सामाजिक कार्यकर्ते सोहेल खान, सलीम बागबान आणि अमीन शेख यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी,आणि मीना नेल्सन यांनी उत्साही शैलीत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!