Homeताज्या बातम्यामहायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी नाही, महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढणार - प्रशांत...

महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी नाही, महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढणार – प्रशांत जगताप

५२ व्या मासिक आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा निर्धार 

पुणे 24 तास:- महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्वतयारीचा शेवटचा टप्पा म्हणून आज आरक्षण सोडत जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ५२ वी मासिक आढावा बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर समविचारी गटांसोबत आघाडी करून निर्धाराने लढणार आहे. तसेच, पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाचा शुभारंभही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला.

कोणत्याही परिस्थितीत महायुतीतील घटक पक्षांसोबत आघाडी – युती करायची नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. महायुतीने पुणे शहराला ट्रॅफिक, गुन्हेगारी, बकालपणा अशा संकटात नेऊन सोडले आहे. तसेच, महायुतीतील तीनही पक्ष समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. अशा धर्मांध शक्तींना सोबत न घेता पुरोगामी महाराष्ट्राची पताका खांद्यावर घेऊन आपण पुणे शहराला पुन्हा एकदा सुसंस्कृत व सुनियोजित शहर बनवण्यासाठी निर्धाराने लढू अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी जाहीर केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, ज्येष्ठ नेते  अंकुशअण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष  रवींद्रअण्णा माळवदकर,  प्रकाश मस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!