Homeधार्मिकमामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया...

मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया…

पुणे 24 तास: मोहिनी मोहिते

मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया

पुण्यातील जैन मंदिर व जैन होस्टेलच्या जागेचा अपहार : राष्ट्रवादी व काँग्रेसचे भाजपच्या व मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आंदोलन

जवळपास ३ आठवड्यापासून पुण्यातील जैन मंदिर व जैन होस्टेलच्या जागेच्या विक्रीचा व्यवहार देशभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामेभाऊ महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त आहेत. या आयुक्तांना हाताशी धरून जैन मंदिर व होस्टेलच्या जागेचा व्यवहार कवडीमोल भावात करण्यात आला. समाजाची जागा बिल्डरच्या घशात घालणाऱ्या या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्षाच्यावतीने धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

पूर्वीच्या काळी दानशूर मंडळींनी आपल्या समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या हितासाठी जागा दान केलेल्या आहेत. या जागा सुरक्षित असाव्यात, या जागांचे व्यवहार कायदेशीर असावेत ही धर्मदाय आयुक्तांची जबाबदारी असते. मात्र, केवळ मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आहेत म्हणून या धर्मादाय आयुक्त यांनी पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या गैरव्यवहाराला पाठिंबा दिला.

गेल्या वर्षी महावीर जयंतीच्या शुभ सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना सदर जागेवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हे आमंत्रण स्वीकारून मुरलीधर मोहोळ कार्यक्रमासाठी आले, या जागेवर त्यांची नजर पडली आणि इथेच जैन समाजाचा घात झाला. धर्मादाय आयुक्तांना हाताशी धरून ही जागा गोखले बिल्डर्सच्या घशात घालण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. या जागेच्या विक्रीचा पूर्ण व्यवहार बेकायदेशीर व संशयास्पद आहे. याबाबत आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी ट्रस्टच्या जमिनीच्या विकसनाचे अर्जं गेली १०-१० वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र धर्मादाय आयुक्त यांच्या आशीर्वादाने व केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपाने पुण्यात मात्र अवघ्या १० दिवसात ट्रस्टच्या जमीन विक्रीचा व्यवहार करण्यात आला. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना एखाद्या लाखाचे कर्ज घेण्यासाठी ४-५ दिवस बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. मात्र पुण्यातील जमिनीच्या व्यवहारासाठी गोखले बिल्डर्सला अवघ्या २४ तासात ७० कोटी चे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कर्नाटकातील पतसंस्था यांचे सहाय्य घेण्यात आले. यासाठीही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपले राजकीय वजन वापरले. भ्रष्टाचाराची मालिका इथेच थांबली नाही, यात पुणे महानगरपालिकेनेही आपले योगदान दिले. गोखले बिल्डर्सच्या नावाने जमिनीचा व्यवहार झालेला असताना, त्यावर बांधकामाचा आराखडा मात्र ट्रस्टच्या नावाने करण्यात आला. ट्रस्टच्या नावाने आराखडा केल्यास वाढीव 1 एफएसआय फुकट मिळेल हा स्वार्थी उद्देश यामागे होता. म्हणजे जमिनीचा व्यवहार गोखले बिल्डर्सच्या नावाने, त्यावरील उभारलेली इमारत विकणार गोखले बिल्डर्स, मात्र वाढीव एफएसआय साठी परवानगी मात्र ट्रस्टच्या नावाने. हा भ्रष्ट कारभार पुणे महानगरपालिकेने केला, तोही मुरलीधर मोहोळ यांच्याच दबावामुळे. हा व्यवहार ताबडतोब रद्द करण्यात यावा, या भ्रष्टाचारासाठी कारणीभूत असलेले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, धर्मादाय आयुक्त व महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

यावेळी प्रशांत जगताप यांच्या समवेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, दिप्तीताई चवधऱी, अभय छाजेड, कमलताई व्यवहारे, उदय महाले, किशोर कांबळे, रफिक शेख, अजित दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!