पुणे 24 तास:- पुणे प्रतिनिधी, शंकर जोग
ॲव्हेन्यू मॉलच्या व्यवस्थापनाच्या अन्यायकारक निर्णय व अन्याय विरोधात रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने मार्केट यार्ड पुणे येथील पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळच्या आवारामध्ये उपोषण करण्यात आले.
रिपब्लिकन कामगार सेनेचे सभासद बाबू खान फत्तेखान पठाण हे माथाडी बोर्डाचे नोंदणीकृत कामगार असून वानवडी येथे ॲव्हेन्यू मॉल मध्ये मॉलच्या पायाभरणीपासून ते काम करत आहे. मॉलचे मालक रविंद्र सांखला मॅनेजर दिलीप तोडकर यांनी बाबूखान पठाण यांच्याकडून मॉलची इमारत बांधण्यासाठी येणारे सर्व जड साहित्य वाहून घेतले व काम करून घेतले मॉल तयार झाल्यानंतर मॉलमधील माथाडी स्वरूपाची सर्व कामे तुम्हाला देणार असे व्यवस्थापकाने सांगितले. त्यानुसार वर्क ऑर्डर बाबु खान पठाण यांना देण्यात आले, परंतु 2018 मध्ये लॉक डाऊन लागले, या काळात मॉलच्या मालकाने डमी कामगार भरून काम सुरू केले त्यांची फसवणूक झाली आहे या संदर्भात पुणे माथाडी मंडळाचे अध्यक्ष वाळके सचिव वाघ यांनी आम्हाला सांगितले 2018 रोजी जे वर्क ऑर्डर माथाडी मंडळात जमा झाली आहे त्यानुसार कामगारांची नोंद करून काम चालू करण्यात येईल ,असे सांगितले होते. हे सर्व आम्हाला मान्य झाले होते तरी, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज तीन महिने होत आहे कुठल्याही प्रकारची आमची मागणी मान्य झालेली नाही. तरी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा असे रिपब्लिकन कामगार सेना, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पुणे शहर युवा आघाडी सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल, रिपब्लिकन सेना पुणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष अजय भालशंकर, रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहर अध्यक्ष मिलिंद सरोदे, पुणे शहर सरचिटणीस दत्ता शेंडगे, बाबुभाई पठाण, अनिल खलसे, गणेश खरात, अरबाज पठाण, आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन सेना पुणे शहर युवा आघाडीचे अध्यक्ष अजय भालशंकर यांनी सांगितले की, जोपर्यंत बाबू पठाण यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























