Homeउद्योगकचऱ्याच्या आगीमध्ये ८ वीजवाहिन्या जळाल्या;

कचऱ्याच्या आगीमध्ये ८ वीजवाहिन्या जळाल्या;

विश्रांतवाडी, मोशी, धानोरीमध्ये वीजपुरवठा विस्कळीत

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

:आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर असलेल्या ओढ्यात ट्रेंचवर फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. यात ट्रेंचमधील महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ८ वीजवाहिन्या जळाल्या. आज पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याट्प्याने सुरु करण्यात आला. तर विश्रांतवाडी, कळस परिसरातील सुमारे १० हजार आणि दिघी परिसरातील १७ हजार अशा २७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२.३० वाजेपर्यंत बंद होता.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर एक ओढा आहे. तेथील एका ट्रेंचमध्ये महावितरणच्या ८ वीजवाहिन्या आहेत व त्याद्वारे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, दिघी परिसरातील सुमारे १ लाख ४२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता. साठलेल्या या कचऱ्याला आज पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली. आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोबतच अग्निशमन दलानेही त्वरेने दाखल होऊन पहाटे ३ च्या सुमारास आग विझविली.

यानंतर महावितरणकडून सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये पर्यायी व्यवस्थेतून विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. मात्र विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे पर्यायी वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे १० हजार लघुदाब आणि दिघी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

महावितरणकडून दुरुस्ती कामे त्वरित करण्यासाठी एकाचवेळी ६ कंत्राटदारांना पाचारण करण्यात आले. सोबतच नगररोड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. शारंगधर केनेकर व हर्षितकुमार वाकोडे यांच्यासह शाखा अभियंते, जनमित्रांनी दुरुस्ती कामात सहभाग घेतला.  वीजवाहिन्यांचा जळालेला भाग बदलणे, जॉईंट देणे व इतर कामांसह वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कामे दुपारी १२.३० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा दुरुस्त केलेल्या वाहिन्यांद्वारे सुरू करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!