Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याक्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्तउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्तउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

देशातील पुरोगामी समाजव्यवस्था आणि महिलांचा सर्वक्षेत्रातील वावर हा
महात्मा जोतीबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि परिश्रमांचे फळ
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन

आज समाजाच्या सर्वक्षेत्रातील महिलांचा आत्मविश्वासपूर्ण वावर हे
महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्राबाईंच्या परिश्रमांमुळे शक्य
–उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

“क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक्तीसाठी शिक्षणाची दारं खुली केली. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ठ रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली. आज दिसणारी सामाजिक न्यायाबाबतची जागरुकता, महिलांचा सर्वक्षेत्रातील आत्मविश्वासपूर्ण वावर, देशात निर्माण झालेली प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, केलेला त्याग आणि घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, सामाजिक न्यायावर आधारीत, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचं फार मोठं काम महात्मा जोतीबा फुले यांनी केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्वं पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशानं देशात क्रांती घडविली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी महिलांसाठीची देशातील पहीली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात पहिला आत्मविश्वासानं वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचं सर्व श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा जोतीबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणं, हे त्यांना खरं अभिवादन ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!