Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यजी बी एस हा आजार नक्की काय आहे: डॉ.प्रमोद लोहार

जी बी एस हा आजार नक्की काय आहे: डॉ.प्रमोद लोहार

पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )

Guillain-Barre Syndrome (GBS)

या आजाराचा किंवा Syndrome चा शोध *French neurologists Georges Guillain आणि Jean Alexandre Barré यांनी १९१६ साली लावला म्हणून त्यांच्या नावामुळे या Syndrome चे नाव *Guillain-Barre Syndrome* असे पडले.

या आजारामध्ये माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःच्या नर्व्हस सिस्टीम वर हल्ला चढवते. आणि शरीरातील नसा आणि स्नायू यांचे कार्य त्यामुळे बाधित होते. म्हणजेच हा एक प्रकारे ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार आहे. हा आजार अचानक एखाद्याला का होतो याचे अजून ठाम स्वरूपाचे उत्तर सापडलेले नाही. पण असे लक्षात आले आहे की बरेचदा एखादे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर काही वेळेला लसीकरणानंतर किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली असते अशा वेळेला हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती (Immune System) हायपर रिऍक्ट होते.
कधी कधी काही रुग्णांमध्ये याचे निदान पटकन होत नाही. एखादा रुग्ण पायामध्ये अशक्तपणा वाटत आहे किंवा संवेदना कमी झालेल्या आहेत म्हणून डॉक्टरांकडे येतो. अशा वेळेला त्या रुग्णांमध्ये हा आजार असेल याचा पटकन अंदाज कधी कधी येत नाही आणि बाकी अन्य कारणांचा विचार केला जातो. पण कालांतराने पायामधील संवेदना कमी होणे तसेच ताकद कमी होणे, उभे राहण्यासाठी-चालण्यासाठी पायात जीव न राहणे अशी लक्षणे पुढे दिसायला लागल्यानंतर या आजाराचा संशय येतो.
हे रुग्ण सुरुवातीला कमी न होणारा ताप , ज्याचे नक्की निदान होत नाही असे लक्षण घेऊन येतात आणि नंतर या रुग्णांमध्ये मज्जा संस्था (नर्व्हस सिस्टिम रिलेटेड विकनेस) आणि इतर लक्षणे दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये श्वसनाचे स्नायू पण दुर्बल व्हायला लागतात आणि रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि मग त्याला श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू लागते.

GBS हा दुर्मिळ परंतु बरा होणारा आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, नसा (nerves)कमजोर करते. यामुळे हातपाय, मान, डोळे आणि चेहरा यावर परिणाम होतो. शरीरामध्ये बधीरता येते. गंभीर प्रकरणांमध्ये चालता येत नाही, श्वास घेता किंवा गिळता येत नाही. हा आजार अचानक सुरू होतो आणि चार आठवड्यांत वाढतो. काही जणांमध्ये आजार लवकर बळावतो, तर काहींमध्ये हळूहळू वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये ICU व व्हेंटिलेटरची गरज भासते. उपचारांसाठी IVIg इंजेक्शन किंवा प्लाझ्मा एक्सचेंज केला जातो.

कॅम्पिलोबॅक्टर GBS

दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर संसर्गदेखील याला कारणीभूत ठरू शकतात.

कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्गाची लक्षणे

▫️ जुलाब (रक्तसह होऊ शकतो)
▫️ पोटदुखी
▫️ ताप
▫️ मळमळ किंवा उलट्या

काळजी

▫️ नेहमी पाणी उकळून प्या
▫️ सकस व ताजे अन्न घ्या
▫️ भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या
▫️ चिकन, मासे चांगले शिजवुन घ्या (७५°C तापमानाला)
▫️ अर्धवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा
▫️ स्वच्छता पाळा-जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा
▫️ दुसऱ्यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा
▫️ किचन स्वच्छ ठेवा
▫️ कच्चे व शिजलेले अन्न वेग-वेगळे ठेवा
▫️ स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा

हा आजार सामान्यतः दुर्मिळ आहे पण मागच्या काही आठवड्यांत सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत.

सुरुवातीला जाणवणारी लक्षणे

▫️ अतिसार किंवा खोकला येणे
▫️ पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे
▫️ चालता न येणे किंवा शरीर बधीर होणे
▫️ रक्तासह अतिसार होणे

अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!