Homeक्राईमपाषाणमध्ये कारवाईची भीतीने महिलेचे १३ लाख लुटलेबाणेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः

पाषाणमध्ये कारवाईची भीतीने महिलेचे १३ लाख लुटले
बाणेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारादर महिला पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी २ जानेवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैसे व्यवहारात कारवाई करण्यात येणार आहे. महिलेच्या बँक खात्याचा वापर व्यवहारांसाठी करण्यात आला असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर याप्रकरणात अटक टाळण्यासाठी (डिजिटल ॲरेस्ट) तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने चोरट्यांच्या खात्यात १३ लाख २३ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
पाषाण भागातील आणखी एकाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून १७ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांना गेल्या वर्षी मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला तक्रारादाराने रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने तक्रारदाराने आणखी रक्कम गुंतविली. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देणे बंद केले.

‘डिजीटल ॲरेस्ट’च्या नावाने फसवणुकीचे वाढते प्रकार
वेगवेगळी आमिषे, तसेच तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन फसवणूक करण्याचे प्रकार वाढते आहेत. नागरिकांनी चाेरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!