Homeताज्या बातम्यामहाबँक कर्मचाऱ्यांचे सोमवारी 'लोकमंगल'समोर धरणे आंदोलन

महाबँक कर्मचाऱ्यांचे सोमवारी ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन

पुणे: (पुणे 24 तास ब्युरो )

कर्मचारी भरती करावी, व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, बँक व ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने येत्या सोमवारी (दि. १७ मार्च) सकाळी १० वाजता महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे (महाबँक) मुख्यालय असलेल्या शिवाजीनगर येथील ‘लोकमंगल’ संकुलासमोर देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अखिल भारतीय सरचिटणीस कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी दिली. महाबँकेच्या ५१ झोनल ऑफिसमध्ये कार्यरत ५०० कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात या धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत. यावेळी संघटनेचे शिष्टमंडळ बँकेच्या वरिष्ठ कार्यपालकाना भेटून मागण्यांचे निवेदन देणार आहेत, असेही ते म्हणाले.

देविदास तुळजापूरकर म्हणाले, “महाबँकेतील कर्मचारी सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी देशव्यापी आंदोलन करत आहेत. बँकेत ७०० शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेच्या ३१८ शाखामध्ये एकही क्लार्क नाही. १२९० शाखामध्ये केवळ एक क्लार्क आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना वेळेनंतर, सुट्टीच्या दिवशी काम करावे लागते. रजा मिळत नाहीत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. ग्राहकसेवेवरही विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकांची संख्या वाढली, पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने समाधानकारक सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचारी भरती करावी, या मागणीसाठी महाबँकेतील कर्मचारी आंदोलन करत आहेत.”

दरम्यान, सोमवारी (दि. १७ मार्च) केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने रिजनल लेबर कमिशनर, व्यवस्थापन आणि संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजिली आहे. या सभेत व्यवस्थापनाने मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर महाबँक कर्मचारी २० मार्चला देशव्यापी संपावर जाणार आहेत. सध्या क्लार्कच्या दोन हजार, शिपायांच्या एक हजार तर सफाई कामगारांच्या २५०० जागा रिक्त आहेत, असे संघटन सचिव शैलेश टिळेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!