‘
-महिला दिनानिमित्त एमटीडीसीचा उपक्रम
पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )
‘जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘कारवाईत गती आणा’ (अॅक्युरेट अॅकशन ही थीम घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या थीमच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन या थीमद्वारे केले जाते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमटीडीसी दरवर्षी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि अभियानांचे आयोजन करण्यात येते. सगळयाच क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे, खंबीरपणे परिस्थितींचा सामना करणार्या रणरागिणींना महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्या प्रति असलेला आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची भावना व्यक्त होत असते. त्यास अनुसरुन एमटीडीसीचे व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधत 1 ते 8 मार्च या कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणार्या महिला अतिथिंना आणि त्यांच्या परिवारास निवासकक्ष आरक्षणावर 50टक्के सूट देण्यात आली आहे. या सवलती फक्त निवास कक्ष आरक्षणावर आहे. असून त्यानुसार ईपी प्लॅन (ऑन्ली रूम ) ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपहारगृहांमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी ही सवलत लागु नाही. महिला दिनाच्या औचित्याने देण्यात आलेल्या आरक्षण सवलतींना अनुसरुन एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास ते रद्द करता येणार नाही, तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत महामंडळाच्या संकेतस्थळावर अधिक माहीती देण्यात आलेली आहे.
महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथीचे आगमन होताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान शाखेद्वारे सर्व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महिला अतिथीना 50 टक्के आरक्षण सवलत देणेकरिता संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच महामंडळाच्या काही पर्यटक निवासामध्ये महीलांसाठी खास हेल्थ झोन तयार करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि अजिंठा-टी पाँईंट येथील महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.अशीच शिबीरे राज्याच्या इतर भागातही आयोजित करण्यात आली आहेत.याबरोबरच इनडोअर उपक्रमात योगा, झुंबा, डान्स, अरोबिक प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी टी.व्ही. आणि स्पिकरचीही सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी महीलांना आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करता येणार आहे. खास महीलांसाठी आणि पर्यटक निवासात येणार्या पर्यटकांसाठी ओपन जीम ची सोय आगामी काळात करण्यात येणार असुन या ठिकाणी मुलांसाठी खेळणी देण्यात येणार आहेत. या ओपन जीम साठी उच्च दर्जाचे रबरी फ्लोरींगचा वापर करण्यात येणार आहे.
———————————
पर्यटन क्षेत्रात महीलांचा सहभाग वाढत असल्याने आणि पर्यटनास नव्याने चालना मिळत आहे. त्यामुळे महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे मोठया प्रमाणावर आरक्षित होत असुन या उत्साही वातावरणामध्ये महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या सवलतींचा महिला पर्यटकांनी लाभ घ्यावा.
-दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
———————————-

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























