Homeताज्या बातम्याविश्रांतवाडी येथील वसतिगृहाचा प्रश्न सोडविणार- समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट

विश्रांतवाडी येथील वसतिगृहाचा प्रश्न सोडविणार- समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट

-बार्टीच्या कंत्राटी कर्मचा-यांच्या प्रलंबित वेतनवाढीबाबत मार्ग काढणार
पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )
      समाज कल्याण विभागाचे विश्रांतवाडी येथील वसतीगृहातील  1000 विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबविले आहे. तसेच तेथील यूपीएससी केंद्र बंद पडले आहे. या दोन्ही बाबत   सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आहे. असे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले .या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडविल्या जातील तसेच बार्टीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या पगारवाढीबाबत  लवकरात लवकर चर्चा करून  निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
   राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट बुधवारी पुणे दौ-यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध विषयावर प्रश्न विचारले असता. त्यांनी ही माहिती दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्यासह इतर अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बार्टीचे राज्यात सुमारे 1200 कर्मचारी विविध विभागात कंत्राटी पध्दतीने कार्यरत  आहेत. त्यांना गेल्या दहा वर्षापासून वेतनामध्ये वाढ झाली नाही. त्यांनी मंत्र्री शिरसात यांना वेतनवाढीबाबत निवेदन दिले. त्यांवेळी त्यांनी कंत्राटी कर्मचा-यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत लकवरच निर्णय घेऊन असे आश्वासन कर्मचा-यांना दिले.यावेळी मंत्री शिरसाट यांनी अधिका-यांबरोबर विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली.
      शिरसाट म्हणाले,“  समाज कल्याण विभागाचे अनेक प्रश्न मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहेत.हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विश्रांतवाडी येथे 1000 क्षमतेचे वसतिगृह आहे. हे वसतिगृह ताब्यात घेण्यासाठी काही तांत्रिक समस्या आहेत.त्याची माहिती घेण्यात येणार आहे. यु.पी.एस.सी.बाबत देखील काही समस्य आहेत.त्याची माहिती घेण्यात येणार असून, त्यावर देखील मार्ग काढण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची दखल घेतली जाणार आहे.
———————————-
 
-राज्यातील काही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद प्रश्न अजुनही सुटला नाही. याबाबत विचारले असता मंत्री शिरसाट म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.एकनथ शिंदे यांची बैठक नुकतीच झाली आहे. त्याबाबत लवकर निर्णय होईल.
– उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर येथील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना (शिंदे गट ) प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत शिरसाट म्हणाले खैरे यांना निवडणुकीपूर्वीच या असे निमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. आता येऊन काय उपयोग अशा टोला शिरसाट यांनी लगावला.
———————————–
  चौकट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची मंत्रालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर होते. ते नाराज आहेत. असे विचारले असते शिरसाट म्हणाले त्या दिवशी शिंदे काही कामानिमित्त बाहेर होते.त्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
——————————–  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!