Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याअवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश*

अवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश*

पीएमआरडीएमधील बैठकीत महत्त्वपूर्ण न‍िर्णय; रहदारीच्या वेळेत अवजड वाहने नको

पुणे 24 तास ब्युरो

हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच शहरात यायला हवी. यासह बांधकाम व्यवसायिकांनी याबाबत खबरदारी घेत ज्या भागात त्यांची बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करत संबंधित वाहन चालक कुठल्या नशेत नसल्याची खात्री करूनच त्याचे परवाने अध्यायवत असलेल्याबाबत खात्री करूनच एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पसाइटवर अद्यावत ठेवावी, असे निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात सोमवारी झालेल्या अधिकारी आण‍ि बांधकाम व्यवसायिकांच्या बैठकीत व‍िव‍िध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली

सध्या शहरालगत असलेल्या हिंजवडी – माण, म्हाळुंगे परिसरात अनेक बांधकाम व्यवसायिकांच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम करताना संबंधितांना अवजड वाहनांद्वारे सिमेंट, स्टील आदी साहित्यांची वाहतूक करावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित वाहनांपासून सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित अपघात टाळण्यासाठी पीएमआरडीएने सोमवारी हिंजवडी – माण, म्हाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेत अवजड वाहनांबाबत पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात आणावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

आयटीनगरी असलेल्या हिंजवडी – माण भागात सकाळी आण‍ि सायंकाळी दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. यादरम्यान बऱ्याचदा बांधकाम व्यवसायिकांची अवजड वाहने या मार्गावर धावत असल्याने इतर वाहनचालकांना अडचणी येतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार सोमवारी विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह हिंजवडी – माण, महाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिक यांच्या प्रतिनिधी व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
——-
*त्या बांधकाम व्यवसायिकाचे काम थांबवणार*
हिंजवडी भागात शुक्रवारी काँक्रीट मिक्चरखाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवला असून याआधारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित वाहन ज्या ठिकाणी काम करण्यासाठी जात होते, त्या ठिकाणची बांधकाम परवानगी रोखणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

– डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी,पीएमआरडीए

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!