
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ पुणे अहिल्याआश्रम, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अविनाश बागवे व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 16 संघ सहभागी झाले,
या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
निकाल पुढील प्रमाणे:
यास्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजेवाडी (आर सी सी) संघ, द्वितीय क्रमांक कसबा वॉरियर संघ तर तृतीय क्रमांक एकता क्रिकेट संघाने पटकविला.
या विजेता संघांना स्मृतिचिन्ह व विजय चषक देऊन त्यांचा गौरवण्यात आला.
या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस व मातंग एकता आंदोलन राजेवाडी शाखेचे अध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले होते.
यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, किरण लोंढे, सुरेश अवचिते, विकी भिसे, राजू शेखमेजर, साहिल खान, कौस्तुभ वाघमारे, विशाल पवार, अक्षय पवार, चंद्रकांत वाघमारे, किरण चकाले, आदि यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























