Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याकष्टकऱ्यांवर  कोसळला दुःखाचा डोंगर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

कष्टकऱ्यांवर  कोसळला दुःखाचा डोंगर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

कष्टकऱ्यांवर  कोसळला दुःखाचा डोंगर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

पुणे 24 तास:-  एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हे  तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे (दि. 8)आज रोजी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने 28 नोव्हेंबर रोजी त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.त्याच्या जाण्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाबा आढाव यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यपणाला लावले.

आढाव यांनी त्यांचे संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते. ‘हमाल पंचायती’ची स्थापना ही त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा ठरली. याच्या माध्यमातून आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटन केले. याशिवाय जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

बाबा आढाव यांचा जीवनप्रवास खडतर होता. 

बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 साली पुण्यात झाला होता. ते नाना पेठेतील नामांकीत आयुर्वेदिक डॉक्टर होते. नाना पेठ हा शहरातील बाजारपेठेचा भाग असल्याने अनेक व्यवसायांतील कामगार तिथे येत असत. त्यामुळे हमालांना येणार्‍या अनेक अडचणी आढाव यांच्या लक्षात येऊ लागल्या. हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. या गोष्टींचा आढाव यांच्यावर खोलवर परिणाम झाला. अखेर त्यांनी १९६६ मध्ये आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्ववसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. 1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम त्यांनी चालवली होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते.

बाबा आढाव यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा

– 1942 : राष्ट्र सेवा दलाचे सदस्य; साने गुरुजी, एस.एम. जोशी यांच्यापासून प्रेरणा.

– 1948: विठोबा मंदिर दलित प्रवेश लढा व गांधीहत्यानंतर ब्राह्मणांचे संरक्षण.

– 1952 : अन्नधान्य दरवाढीविरुद्ध पहिला तुरुंगवास.

– 1955 : हमाल पंचायतीची स्थापना – हमालांच्या हक्कांसाठी लढा.

– 1955 : गोवा स्वातंत्र्य संग्रामात सहभाग.

– 1956 : संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग.

– 1959 : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन आंदोलन.

– 1962 : धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी चळवळ; एका डोळ्याची दृष्टी गमावली.

– 1966 : पत्नी शीलाताईंशी विवाह; खाजगी वैद्यकीय सेवा सोडली.

– 1966 : हमालांसाठी क्रेडिट युनियनची स्थापना.

– 1968 : हमालांसाठी सामुदायिक केंद्र प्रकल्प.

– 1969 : माथाडी व हमाल कायदा – पहिला सामाजिक सुरक्षा कायदा.

– 1972: ‘एक गाव, एक पानवठा’ उपक्रम – दलितांना पाण्याचा हक्क.

– 1972: ‘कष्टाची भाकर’ – परवडणारे पौष्टिक भोजनालय सुरू.

– 1977 : पथकरी पंचायत स्थापना – फेरीवाल्यांचे हक्क.

– 1978 : देवदासी निर्मूलन परिषद – देवदासी महिलांचे पुनर्वसन.

– 1979 : हमाल नगर – हमालांसाठी परवडणारी घरे. धार्मिक, जातीय आणि एकात्मतेसाठी प्रयत्न

– 1970: मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापना.

– 1982 : राष्ट्रीय एकात्मता समिती.

– 1989: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करायला प्रेरणा

विविध कामगार संघटना आणि उपक्रम

– 1993 : कचरा वेचकांसाठी ‘कागद काच पत्र कष्टकरी पंचायत’ स्थापना.

– 1993 : बांधकाम कामगार पंचायत.

– 1994 : रिक्षा पंचायत – ऑटो रिक्षा चालकांसाठी.

– 2000 : हमाल पंचायत विद्यालय व ग्रंथालय – असुरक्षित कामगारांच्या मुलांसाठी शाळा.

– 2005 : महाड ते दिल्ली सायकल रॅली – सामाजिक सुरक्षा कायद्याची मागणी.

– 2007: 20 संघटनांचे प्रतिनिधित्व करणारा सत्याग्रह – दिल्लीमध्ये.

– 2008 : अन्नधान्य दरवाढीविरुद्ध पुन्हा एकदा तुरुंगवास – 53 व्यांदा.

– 2012 : अरुणा रॉय यांच्यासह पेन्शन परिषद.

– 2013 : 40 कोटी अनौपचारिक कामगारांसाठी राष्ट्रीय स्तरावर सामाजिक सुरक्षा आणि पेन्शनसाठी चळवळ.

विशेष लढे आणि उपक्रम

– 2000 : जयपूर न्यायालयाजवळील मनूच्या मूर्तीविरोधात लढा.

– संपूर्ण जीवन : असंघटित कामगार, दलित, महिलांचे

हक्क, धार्मिक एकता, आणि सामाजिक न्यायासाठी सातत्यपूर्ण लढा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!