Homeताज्या बातम्याकेशवनगर भागात चार दिवसांपासून रात्रीचा वीजपुरवठा खंंडित होण्याचे प्रमाण वाढले

केशवनगर भागात चार दिवसांपासून रात्रीचा वीजपुरवठा खंंडित होण्याचे प्रमाण वाढले

– महावितरणच्या गैरकारभाराला नागरिक वैतागले
– आंदोलन करण्याच्या तयारीत
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
      केशवनगर (मुंढवा) परिसरात ऐन उन्हाळ्च्या दिवसात गेल्या चार दिवसांपासून रात्री उशीरा वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. या खंडित होणा-या वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. अगोदरच उकाडा त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी आता महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
    सध्या कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण होत आहेत.त्यातच गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानत वाढ झाली आहे. त्यामुळे कितीही पंखे अगर वातानुकुलित यंत्रणा लावल्या तरी उकाडा कमी नसल्याचे दिसून आले. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून रात्री दोन वाजल्यापासून पहाटी पाच वाजेपर्यत रोजच वीज पुरवठा खंडित होत आहे. परिणामी नागरिकांची चांगलीच झोप मोड आहे.बहुतांश नागरिकांना सकाळी कामावर जायचे असते. मात्र या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर कामावर जाता येत नाही. याबाबत बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच हडपसर उपविभागाचे अतिरिक्त अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना वारंवार नागरिक फोन करून तक्रारी करीत आहेत.मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे ते फोन उचलत नाहीत. अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. या भागातील खंडित वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करून असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
 ————————–
कोट
 केशवनगर भागात गेल्या चार दिवसांपासून रात्रीचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत् आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. महावितरण वीज कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरूस्ती करावी
– सोमनाथ गायकवाड्- सामाजिक कार्यकर्ते-केशवनगर  
——————————-
  कोट
 महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे वारंवार वीज पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित होत आहे.त्यामुळे लक्ष दिले नाही तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
-संजय कदम -स्थानिक ग्रामस्थ -केशवनगर
——————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!