Saturday, August 22, 2026
spot_img
Homeदेश-विदेशजुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला पक्ष वाढवायचा आहे : अजित...

जुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला पक्ष वाढवायचा आहे : अजित पवार

पुणे २४ तास ब्युरो : पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्या तसेच देशाच्या अन्य भागातून अनेक नागरीक विविध कारणास्तव वास्तव्यास आले आहेत. या सर्वांना नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल असून, अशावेळी जुन्या व नव्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

      महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस सदानंद शेट्टी व माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्यासह, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे, देविका शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप,  कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, विनोद काळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रोख रक्कमेसह, अन्न धान्य वितरित केले. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन, रिंग रोडचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मित्रानो आम्ही कामाची माणसे आहोत म्हणून सकाळी सहा ला कामाला लागतोय. माणसे जोडली गेली पाहिजे, सर्व समाज पुढे गेला पाहिजे हा आमचा विचार आहे. विकासाच्या वाटेवर आमचा पक्ष नेहमी चालत राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कष्टकरी, दुर्बल, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या बरोबर राहिल याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सदानंद शेट्टी म्हणाले, ६९४ सदनिका मी एस आर ए च्या माध्यमातून घरे दिली. पण माझ्या विरोधात नेहमी राजकारण केले गेले. गेली ३७ वर्षे आम्ही शेट्टी कुटुंबीय महापालिकेत काम करत आहोत. स्थायी समिती अध्यक्ष असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले.नेहमी समाजासाठी काम केले त्याची पावती म्हणून या निवडणुकीत आमच्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडून आणू असा शब्द शेट्टी यांनी यावेळी दिला.

सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे आमची शहरातील ताकद वाढली आहे. कल्पकता असलेले कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी महापालिकेच्या माध्यमाद्वारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, शहरातील पहिला सिमेंट काँक्रीट रस्ता त्यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आला.  यावेळी सुजाता शेट्टी, भीमराव पाटोळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते ३३५ एस आर ए च्या प्रकल्पातील घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!