Homeताज्या बातम्यास्टेला मारीस शाळेतील विदयार्थ्यांनी गिरवले सायबर क्राइम चे धडे

स्टेला मारीस शाळेतील विदयार्थ्यांनी गिरवले सायबर क्राइम चे धडे

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

स्टेला मारीस शाळेच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम चे धडे…
वडगाव शेरी येथील स्टेला मारीस हायस्कूल च्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिट असताना त्यांना सर्वप्रथम ऑक्सिजन पार्क मध्ये नेऊन झाडांविषयी माहिती दिली आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन कसा मिळतो याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना काही काळ बागेमध्ये खेळण्यास सोडण्यात आले. नंतर ऑक्सीजन पार्कच्या समोरच असणाऱ्या स्वराज्य खादी भांडार येथे नेण्यात आले व आपल्या स्वदेशीय खादी कपड्यांविषयी माहिती देण्यात आली स्वदेशी कपडे वापरण्याबद्दल सांगण्यात आले.
स्वराज्य खादी भांडार चे मालक श्री सागर शेठ इंगळे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
त्यानंतर फिल्ड व्हिजिटमध्ये चंदन नगर पोलीस स्टेशन अंकित सायबर क्राईम या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्यात आले व तेथे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम कसा असतो कशी आपली फसवणूक होते याबद्दल सांगण्यात आले.
यामध्ये सर्वप्रथम सायबर क्राईम शाखेच्या अधिकारी PSI मोरे मॅडम व शितल वानखेडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन खेळ न खेळता मैदानी खेळ खेळले पाहिजे असे सांगितले. ऑनलाइन खरेदी करू नये त्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते आणि कुठलीही मोबाईल मध्ये आलेली लिंक आपण ओपन करू नये त्याद्वारे आपली फसवणूक होऊ शकते अशी माहिती दिली.
तसेच ट्रॅफिक पोलिसांनी विद्यार्थ्यांना अठरा वर्षानंतर गाडी चालवावे आणि विना लायसन गाडी चालवू नये अन्यथा कोणाचे काही नुकसान झाल्यास त्यांच्या पालकांना जबाबदार धरले जाईल . जर विना लायसन गाडी चालवताना कोणाला पोलिसांनी पकडले तर पालकांवर गुन्हा होऊ शकतो हे समजावून सांगितले.
तसेच सायबर क्राईम चे पोलीस अधिकारी माननीय श्री. भारत उकिर्डे साहेबांनी विद्यार्थ्यांना जास्त मोबाईल न वापरता आपण अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि खेळाकडे लक्ष द्यावे अभ्यास करण्यासाठी आपले शरीर सुदृढ असणे गरजेचे आहे यासाठी आपण रोज कमीत कमी एक तास व्यायाम करायला हवा असे सांगितले..
या फिल्ड विजिट कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अर्कंन फर्नांडिस यांनी केले.
चंदननगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना सायबर प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे क्रीडा शिक्षक श्री राजू शिंदे यांनी केले.
आणि शाळेच्या शिक्षिका . सुषमा जोंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!