पुणे-२४तास :-
कल्याण रेल्वे स्थानकात भरदुपारी थरार! स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक म्हणणाऱ्या हर्षिश कांबळे याला लाच घेताना रेल्वेच्या सतर्क पथकाने रंगेहाथ पकडले. प्राथमिक चौकशीत त्याचा रेल्वे प्रशासनाशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका रेल्वे कर्मचाऱ्याला फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हर्षिश कांबळे यांनी डीआरएम कार्यालयाशी संबंधित काही थकीत देयके लवकर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून लाच मागितली.
कर्मचाऱ्याच्या संशयामुळे हा प्रकार तत्काळ रेल्वेच्या दक्षता विभागाला कळवण्यात आला. विभागाने सापळा रचून ठरलेल्या ठिकाणी आणि वेळेत कांबळे याला रंगेहाथ पकडले. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अशा फसवणूक करणाऱ्यांकडून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
संबंधित आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, त्याने यापूर्वी इतर कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे का, याची चौकशी केली जात आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























