Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईमअट्टल वाहनचोरट्याकडून १३ वाहने जप्तदरोडा व वाहनचोरविरोधी पथक-२ची कामगिरी

अट्टल वाहनचोरट्याकडून १३ वाहने जप्त
दरोडा व वाहनचोरविरोधी पथक-२ची कामगिरी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

अट्टल वाहनचोर व विधीसंघर्षित बालकांकडून १३ चोरीची वाहने जप्त करून १२ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली. आरोपीकडून सहा लाख ५८ हजार रुपयांचामुद्देमाल जप्त केल्याचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी सांगितले.
सहायक पोलीस फौजदार अशोक आटोळे व राजेश लोखंडे यांना सूत्रांकडून वाहनचोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार घटनस्थळी धाव घेत आशितोष साबळे (वय २४, रा. गोपाळपट्टी, मांजरी बु।।) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपींनी शहर व परिसरातून ११ वाहने चोरल्याची कबुली दिली. तसेच तीन विधीसंघर्षित बालकांनी मोटारी चोरल्याचे सांगितले. आरोपीकडून सहा लाख ५८ हजार रुपयांच्या १३ दुचाकी जप्त करून १२ गुन्हे उघडकीस आणल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी सांगितले.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवारसहायक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, पोलीस अंमलदार अशोक आटोळे, राजेश लोखंडे, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजू लोणकर, सुदेश सपकाळ, सुनील महाडिक, गणेश लोखंडे, गणेश गोसावी, दत्तात्रय खरपुडे, सुरेश जाधव, विक्रांत सासवडकर, संदीप येळे, अमोल सरतापे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!